प्राचार्य संजय मिर्जी यांचे प्रतिपादन
। अलिबाग । प्रतिनिधी ।
राज्याच्या शिक्षण क्षेत्रात पीएनपी एज्युकेशन संस्था कात टाकत असल्याचे प्रतिपादन प्राचार्य संजय मिर्जी यांनी केले. कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वेश्वि अलिबाग संकुल अंतर्गत ङ्गप्रभाविष्कारफ ( वार्षिक स्नेहसंमेलन 2021-2022 ) विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम पीएनपी नाट्यगृहात पार पडला. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाचे दीप्रज्वलन आणि उद्घाटन पीएनपी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक निलेश मगर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संजय मिर्जी, मान्यवर प्राध्यापक विक्रांत वार्डे, वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या नम्रता पाटील, उपप्राचार्य डॉ. ओमकार पोटे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रिना म्हात्रे, कोरीओग्राफर अलंकार पाटील तसेच विद्यार्थी आणि पालक मोठ्या संखेने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संजय मिर्जी यांनी संगितले की, वार्षिक स्नेहसंमेलना करिता कोरोनाच्या नियमावलीमुळे मागील दोन वर्षापासून विद्यार्थी मुकले होते, पुन्हा एकदा वार्षिक स्नेहसंमेलन सुरू करून पीएनपी ने पुन्हा एकदा हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी प्रत्येकामध्ये विशेष कलागुण कौशल्य असणे गरजेचे आहे, तरचं या स्पर्धेच्या युगात टिकता येईल. प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार कलागुण जोपासले पाहिजेत, आपले आवलोकन केले तरचं आपले आयुष्य सुखकर होईल.
संजय मिर्जी,प्राचार्य
विविध अभ्यासक्रमांचा प्रारंभ
संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांच्या संकल्पनेतून पीएनपी संकुलात या वर्षी पासून नॅशनल स्किल ऑफ डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या प्रकारचे कोर्सेस सुरू करण्यात आलेले आहेत आणि भविष्यात सुद्धा दर्जेदार कोर्सेस संस्थेमार्फत घेतले जातील. काळाची गरज बघता पुढील वर्षापासून पीएनपी कॉलेज मध्ये आर्ट्स, कॉमर्स हे दोन्ही विषय इंग्रजी माध्यमातून शिकवले जातील तर आयटी, सायकोलॉजी हे विषय पुढील जून पासून संस्थेत सुरू होणार आहेत. पीएनपी संस्था शिक्षण क्षेत्रात कात टाकत आहे असे सुतोवात कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संजय मिर्जी यांनी दिले.
विक्रांत वार्डे यांनी मार्गदर्शन करताना संगितले की, पीएनपीचे सांस्कृतिक कार्यक्रम कायमचं दर्जेदार राहिले आहेत, सांस्कृतिक कार्यक्रम हे उर्जास्थान असते म्हणजे पुढील आयुष्यात आपण काय घडणार आहोत याची नांदी असते. विद्यार्थ्यांसाठी सर्वांगीण विकासाचे व्यासपीठ आणि युवा ही एक ऊर्जा आहे त्यांना दिशा देण्याचे काम पीएनपी संस्थेमार्फत केले जाते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध नृत्याविष्काराचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश पाटील तर आभार प्रा. निशिकांत कोळसे यांनी मानले.







