| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील वाडगाव येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत पी.एन.पी. कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून अलिबाग तालुक्यात क्रीडा क्षेत्रात दबदबा कायम ठेवला आहे. पी.एन.पी. कनिष्ठ महाविद्यालय नेहमीच गुणवंत विद्यार्थ्यांबरोबरच गुणवंत खेळाडू निर्माण करत असते, याचा प्रत्यय कुस्ती स्पर्धेत दिसून आला. 17 वर्षे वयोगटातील 49 किलो वजनी गट मुली यामध्ये वेदिका जयेंद्र सुतार हिने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच 19 वर्षे वयोगटातील 55 किलो वजनी गट मुली यामध्ये धनुजा रमेश गुंड हिने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच 19 वर्षे वयोगटातील 57 किलो वजनी गट मुले यामध्ये निशाल बाबूराम मांझी याने प्रथम क्रमांक पटकावला. सर्व विजेत्या खेळाडूंचे संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, कॉलेजचे प्राचार्य रविंद्र पाटील, संचालक विक्रांत वार्डे, क्रीडा शिक्षक तेजस म्हात्रे यांनी सर्व विजेता खेळाडूंचे अभिनंदन केले.







