| अलिबाग | प्रतिनिधी |
पी.एन.पी. एज्युकेशन सोसायटीच्या सायरस पूनावाला सीबीएसई स्कूल नागाव येथे दि.2 मे ते 3 जूनपर्यंत समर स्विमिंग कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. याची सांगता दि.5 जून रोजी करण्यात आली. यावेळी जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पहिला गट 8 वर्षाखालील मुले व मुली, दुसरा गट 10 वर्षाखालील गट मुले व मुली, तिसरा गट 14 वर्षाखालील मुले व मुली अशी स्पर्धा पार पडली.
सांगता समारंभासाठी प्रमुख मान्यवर माजी जिल्हा परिषद सदस्य द्वारकानाथ नाईक, नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर, माजी सरपंच निखिल मयेकर, आक्षीच्या सरपंच रश्मी पाटील, तसेच पीएनपी कार्यालयाकडून ॲकॅडमिक डायरेक्टर श्रुती सुतार, राजश्री पाटील, अकाऊंट हेड मनिषा रेलकर, शाळेच्या मुख्याध्यापिका गीतीका भूचर, उपमुख्याध्यापिका बर्टीना मेलीट तसेच, शाळेचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आदि उपस्थित होते.
यावेळी शिबिराच्या सांगता समारंभा प्रसंगी सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. हे शिबीर उत्साहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. मुलांना पोहण्याचे प्रशिक्षक ज्योती घरत यांनी दिले. यांच्या समवेत राकेश म्हात्रे, जीवरक्षक सनी प्रधान यांनी विशेष मेहनत घेतली.