| अलिबाग | प्रतिनिधी |
एल्डेगिव्ह आणि अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशन आयोजित विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत पीएनपी होली चाईल्ड इंग्रजी माध्यम शाळा वेश्वीच्या विद्यार्थ्यांनी अलिबाग तालुक्यात शाळेचा मान उंचावत घवघवीत यश संपादन केले. माध्यमिक विभागा मधून अर्णव महेंद्र पालकर व साईश नित्यानंद झुरे यांनी यश संपादन करून प्रथम क्रमांक मिळून रोख रक्कम 10,000 रुपये पारितोषिक प्राप्त केले. प्राथमिक विभागा मधून दिनेश राऊत व श्लोक भगत यांनी यश संपादन करून तृतीय क्रमांक मिळून रोख रक्कम 5,000 रुपये पारितोषिक प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले. या नेत्रदीपक यशाबद्दल पीएनपी संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा नृपाल पाटील, होली चाईल्ड एस. एस. सी बोर्डच्या मुख्याध्यापिका निसर्गा चेवले व उपमुख्याध्यापिका शर्मिला शेटे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.







