| अलिबाग | प्रतिनिधी |
क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा अधिकारी रायगड व पीएनपी सायरस पुनावाला सीबीएसई स्कूल नागांव यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग तालुका स्तरिय शालेय बुद्धिबळ स्पर्धा पार पडली. पीएनपी संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा नृपाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेकरिता अलिबाग तालुक्यातुन 10, 17 व 19 वर्ष वयोगटातील एकूण 195 मुला मुलींनी सहभाग घेतला होता.
यावेळी शारीरिक शिक्षक संघटना रायगड जिल्हा सचिव पुरुषोत्तम व शाळेच्या मुख्याध्यापिका गितीका भूचर यांनी स्पर्धेकरिता आलेल्या सर्व स्पर्धकांना मार्गदर्शन केले. तर, स्पर्धेचे आयोजन संस्थेचे क्रिडा प्रशिक्षक तेजस म्हात्रे, राकेश म्हात्रे, आदित्य यादव आणि अक्षय डाकी यांनी केले. ही स्पर्धा खेळी-मेळीच्या वातावरणात पार पडली. असून सर्व विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका गितीका भूचर, इंग्रजी माध्यम ॲकॅडमिक को ऑर्डिनेटर श्रुती सुतार, उपमुख्याध्यापिका बर्टीना मेलीट, तालुका क्रिडा समन्वय समिती सदस्य बी. डी. गायकवाड, यतिराज पाटील, संदेश पाटील, बजरंग गुरव, जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे विलास म्हात्रे, पंच अर्थव दातार, कुशल सुशिल गुरव, सर्व शिक्षक, पालक वर्ग तसेच प्रशिक्षक आदि उपस्थित होते.