पीएनपीचे तायक्वांदोमध्ये यश

ओमची राज्यस्तरीय निवड चाचणीकरिता निवड

| अलिबाग | वार्ताहर |

बोईसर पालघर येथे दि. 17 रोजी मुंबई विभागस्तरीय तायक्वांदो क्रीडा निवड चाचणी क्रीडा स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पीएनपी कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता 11 वी कला शाखेत शिकणारा ओम प्रमोद टेंगळे याने उत्कृष्ट खेळ दाखवत सुवर्णपदक प्राप्त केले. या कामगिरीच्या जोरावर त्याची गुरुवार, दि. 21 रोजी लातूर येथे होणाऱ्या 59 किलो वजनी गटाच्या निवड चाचणी क्रीडा स्पर्धेकरिता निवड झाली आहे.

ओम प्रमोद टेंगळे तसेच क्रीडा शिक्षक तेजेश म्हात्रे यांचे संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, महाविद्यालयाचे संचालक विक्रांत वार्डे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र पाटील, उपप्राचार्य निशिकांत कोळसे, आशिष पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version