कविंनी जिंकली रसिकांंची मने

| अलिबाग | प्रतिनिधी |

आपल्या शैलीमध्ये देशभक्तीसह सामाजिक प्रबोधनातून कवितांचे सादरीकरण करत कविंनी अलिबागमधील रसिकांची मने जिंकली. या कवितांचा आनंद प्रेक्षकांनी मनमुरादपणे लुटत कविंना दाद दिली.

हिंदी दिनानिमित्त 14 ते 30 सप्टेंबर पर्यंत राजभाषा पंधरवडा सुरु करण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर सीमा शुल्क सागरी तथा निवारण मंडळ कार्यालय अलिबागच्यावतीने कवि संमेलनाचे आयोजन 26 सप्टेंबर रोजी करण्यात आले. वेश्वी येथील पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य कार्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सीमा शुल्क विभागाचे उपआयुक्त पंकज झा, पीएनपी शैक्षणिक संकुलातील हिंदी शिक्षिका पल्लवी पाटील, कवि सागर त्रिपाठी, लता हया, चंदन राय, महेश दुब, मनोज ओझा, नितीन ढवळे, कॅप्टन राघवेंद्र राघव आदी मान्यवर उपस्थित होते.

लता हया यांनी आपल्या सुमधूर आवाजातून वेगवेगळ्या कवितांचे सादरीकरण केले. त्यानंतर चंदन राय यांनी प्रेम गीतांचे सादरीकरण करून जून्या आठवणींन उजाळा दिला. हास्य सम्राट महेश दुबे यांनी देशभक्तीसह कौटूंबिक जीवनावर अधारित कवितांचे सादरी करत स्वच्छंद जगण्याचा संदेश कवितेच्या माध्यमातून दिला. त्यानंतर सुरेश मिश्र व सागर त्रिपाठी यांनी देखील आपल्या शैलीतून कविता करीत हिंदीचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमांचा आनंद प्रेक्षकांनी मनसोक्त लुटला.

Exit mobile version