पोलादपूर निवडणुका: आरक्षणासह प्रभागरचनेची तयारी

| पोलादपूर | प्रतिनिधी |

तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा तिसरा टप्पा निवडणूक आयोगाच्या हिरव्या कंदिलाच्या प्रतिक्षेत असून आरक्षणासह प्रभागरचनेची तयारी पूर्ण करीत महसूल प्रशासनाने 21 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी सज्जता दर्शविली आहे. मात्र, प्रशासक असलेल्या रायगड जिल्हा परिषद आणि पोलादपूर पंचायत समितीच्या निवडणुका आधी जाहिर होणार की ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा होणार याकडे तालुक्यातील सर्व पक्षियांचे लक्ष लागले आहे.

पोलादपूर तालुक्यातील वझरवाडी, तुर्भे बुद्रुक, तुर्भे खोंडा आणि तुर्भे खुर्द या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांनंतर भोगाव खुर्द, बोरघर, चांभारगणी बुद्रुक, दिविल, गोळेगणी, कालवली, कापडे खुर्द, कोतवाल बुद्रुक, कोतवाल खुर्द, धामणदिवी, लोहारे, ओंबळी, पैठण, पार्ले, परसुले आणि उमरठ या 16 ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यात आल्या. मात्र, तिसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका अद्याप निवडणूक आयोगाच्या अधिकृत घोषणेच्या प्रतिक्षेत आहेत. पोलादपूर तालुक्यातील प्रशासनाने यादरम्यान पोलादपूर पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या दोन जागा आणि 21 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी जोरदार तयारी केली आहे.

Exit mobile version