हातभट्ट्यांवर पोलिसांची कारवाई

पावणेदोन लाखांचा माल नष्ट

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

रायगड पोलिसांनी अवैध दारु धंद्याविरोधात मोहीम उघडून पावणे दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट केला. जिल्ह्यातील जंगल भागात राजरोसपणे अवैध हात भट्टीच्या दारुचे धंदे जोरात सुरु असल्याची माहीती रायगड पोलिसांना मिळाली होती. मुरुड, श्रीवर्धन, वडखळ या चार पोलिस ठाणाहद्दीत अवैध धंद्यांबाबत माहीती पोलिसांना मिळताच धाडी टाकल्या असता 1 लाख 64 हजार 350 एैवज जप्त केला असून तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

जंगल तसेच खाड्यांमध्ये राजरोसपणे गावठी दारूच्या भट्ट्या पेटविण्यात येत असल्याची माहीती गोपनिय सुत्रांकडून पोलिसांना मिळाली होती. माहीती मिळताच मुरुड पोलिसांनी शनिवारी दुपारी 11:45 च्या सुमारास आरोपी हा फणसवाडी येथील मुरूड अलिबाग रोडवर कोटश्‍वरी मंदीराजवळ 51 हजार रुपये किमतीची चोराटी गावठी हातभट्टीची तयार दारू स्वताच्या फायदयाकरीता वाहतूक करीत असताना मिळुन आला. अधिक तपास पोना सागर रोहेकर करीत आहेत.

वडखळ पोलीस ठाणे हद्दीत आरोपी रा. कोलेटिवाडी गावचे फाटयावर, पेण येथे स्वताच्या फायद्याकरिता 80 हजार 950 रुपये किमतीची शासनाने प्रतिबंधीत केलेली गावठी हातभट्टीची तयार दारू बाळगुन स्कुटीवर वाहतुक करीत असताना मिळुन आला.

श्रीवर्धन पोलीस ठाणे हद्दीत अज्ञात आरोपी याने स्वत:चे फायदयाकरीता श्रीवर्धन दांड समुद्रकिनारी असलेल्या सुरुच्या बनात 32 हजार 400 किमतीचे गावठी हातभटटीची दारू तयार करण्यासाठी लागणारे गुळ, नवसागर मिश्रीत रसायन हे आपण दारूबंदी कायदयाचे कक्षेत सापडु नये म्हणुन मुददाम बेवारस होईल अशा स्थितित ठेवुन निघुन गेला.

Exit mobile version