अवजड वाहनांवर पोलिसांची कारवाई

। जेएनपीटी । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील दिघोडे-गव्हाणफाटा महामार्गावर वाहतूककोंडीची समस्या गंभीर बनली आहे. अशा वाहतूककोंडीतून मार्गक्रमण करणार्‍या प्रवाशी वाहनांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. अपघाताला कारणीभूत ठरत असलेल्या बेशिस्त अवजड वाहनांवर कारवाई करण्याचा बडगा उरण वाहतूक पोलिसांनी उचलला आहे. नवी मुंबईचे पोलिस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांनी 27 सप्टेंबरपासून सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत नवीमुंबई पोलीस आयुक्तालय परिसरात अवजड कंटेनर ट्रेलर वाहतुकीला बंदी घातली आहे. असे असतानाही बेशिस्त अवजड वाहनांची रेलचेल दिघोडे, गव्हाण फाटा ते नवीमुंबई परिसरात सुरू होत आहे. एकंदरी नवीमुंबई पोलीस आयुक्तालयाच्या नियमांचे पालन न करणार्‍या अवजड वाहनांवर उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

Exit mobile version