| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत पोलीस ठाण्याच्या माध्यमातून अंमली पदार्थ विरोधी दिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने सहा माध्यमिक शाळांमध्ये पोलीस दलातर्फे विविध कार्यक्रम सादर करून जनजागृती निर्माण करण्यात आली. यावेळी तासगावकर महाविद्यालय, अभिनव महाविद्यालय तसेच कडाव शाळा, रा.जि.प शाळा भिसेगाव, रा.जि प शाळा गुंडगे, आश्रम शाळा पिंगलस, डोंबे हायस्कूल दहिवली यांना भेटी देऊन तेथील विद्यार्थ्यांना अंमली पदार्थाविरोधात जनजागृती करण्यात आली. त्यांना अंमली पदार्थाच्या सेवनापासून दुर रहावे, त्याच्या सेवनाचे दुष्परिणाम काय आहेत, याबाबत माहिती देऊन जागृती निर्माण केली. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थ सेवन करणार नाही ह्याबद्दल सामूहिक शपथ घेतली आहे.







