सुधीर चेरकरच्या मागे पोलीस

। अलिबाग । प्रतिनिधी ।

रेवदंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घुसून एका महिलेला अश्‍लील शिवीगाळी करून तिला मारहाण केल्याप्रकरणी फरार असलेल्या भाजप पदाधिकार्‍याच्या मागे पोलीस हात धूऊन मागे लागले आहेत. गेल्या चार दिवसांपासून तो फरार आहे. त्यामुळे रेवदंडा पोलीस त्याच्या शोधात आहेत. त्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली आहेत.

कौटूंबिक वादातून मारहाणीत पतीला दुखापत झाली होती. त्यामुळे रेवदंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पतीला उपचारासाठी महिला घेऊन आली होती. शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास वरंडेचे माजी सरपंच सुधीर चेरकर यांनी रुग्णालयात घुसून त्या महिलेला अश्‍लील शिवीगाळ केली. त्यानंतर तिला मारहाण करून जखमी केली. रुग्णालयात महिलेला मारहाण केल्याप्रकरणी रेवदंडा पोलिसांनी सुधीर चेरकर विरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर सुधीर चेरकरने तेथून पळ काढला. गेल्या चार दिवसांपासून तो फरार आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथक तयार करण्यात आले आहे. पथकामार्फत पोलिस त्याचा शोध घेत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. मात्र अजूनपर्यंत तो पोलिसांच्या तावडीत सापडला नसल्याची माहिती समोर येत आहे.

Exit mobile version