श्रीवर्धनमध्ये पोलिसांचा रूट मार्च

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

येत्या 7 फेब्रुवारी रोजी राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार आहेत. निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांनी आपले उमेदवार उभे केले असून सर्वत्र प्रचाराचा धुमधडाका सुरू आहे. या निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. मतदानाची व मतमोजणीची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी गुरुवारी (दि.5) श्रीवर्धन पोलिसांनी श्रीवर्धनमध्ये रूट मार्च काढला. या रूट मार्चमध्ये सशस्त्र पोलीस दल, त्याचप्रमाणे होमगार्डचे जवान सहभागी झाले होते. श्रीवर्धनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड व पोलीस उपनिरीक्षक प्रदीप राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च श्रीवर्धन शहरातून काढण्यात आला. श्रीवर्धन परिवहन स्थानकाजवळ असलेल्या मोकळ्या जागेत रूट मार्चनंतर काही प्रात्यक्षिके देखील घेण्यात आली.

Exit mobile version