| भाईंदर | प्रतिनिधी |
भाईंदर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपायाने गुरुवारी (दि. 14) सकाळी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने पोलीस आयुक्तालयात एकच खळबळ उडाली आहे. रितिक चौहान (24) असे या पोलीस शिपायाचे नाव असून तो मूळचा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर गावातील रहिवासी होता. मिरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात 2023 च्या पोलीस भरतीद्वारे रितिक चौहान सामील झाला होता. त्यानंतर भाईंदर पोलीस ठाण्यात सध्या नेमणूक होती. गळफास घेतल्यानंतर पोलिसांना माहिती मिळाली. घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठण्यात आला आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसून तपास सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांनी दिली.







