रेव्ह पार्टीवर पोलिसांची कारवाई; 100 जणांना अटक

| मुंबई | वृत्तसंस्था |

नववर्षाच्या स्वागतापूर्वीच ठाण्यातील एका रेव्ह पार्टीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत 100 हून अधिक तरुणांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी ड्रग्जचे सेवेन केले आहे का यासाठी त्यांची ठाणे सरकारी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून अहवाल प्रलंबीत आहेत.

पोलिसांनी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास टाकलेल्या छाप्यात एलएसडी, चरस, गांजा, असे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. मुंबईला लागून असलेल्या ठाण्यातील घोडबंदर रोडवरील रेव्ह पार्टीमध्ये तरुणांव्यतिरिक्त 12 मुलींनाही ताब्यात घेण्यात आले आहे. पकडण्यात आलेले बहुतांश तरुण अंमली पदार्थांचे सेवन करत होते. खासगी प्लॉटमध्ये ही पार्टी सुरू होती. या पार्टीत एलएसडी, चरस, गांजा, दारू अशा अनेक प्रकारची नशा उपलब्ध करून देण्यात आली होती. या रेव्ह पार्टीचा सूत्रधार कळवा डोंबिवली परिसरातील रहिवासी असल्याचे पोलिसांना आढळून आले. सहभागी झालेल्या लोकांच्या 19 दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत पाच हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे. मुंबईला ड्रग्जमुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version