| नागोठणे | वार्ताहर |
स्मार्ट पोलिस ठाणे अंतर्गत जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाणे हद्दित आपापल्या पोलिस ठाणे हद्दीत विविध प्रकारचे सुचना फलक, मार्गदर्शन फलक लावण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून नागोठणे पोलिस ठाणे हद्दितही डोलवीत(पेण) येथील जेएसडब्ल्यू स्टील या कंपनीच्या सहकार्याने नागोठणे पोलिस ठाणे हद्दीतही नागरिकांसाठी विविध फलक लावण्यात आले आहेत.
रोहा मार्गावरील भिसे खिंडीच्या मध्यावर नागोठणे पोलिस ठाण्याची हद्द संपल्याचा व रोहा पोलिस ठाण्याची हद्द सुरु झाल्याचा फलक त्यावर संबधित पोलिस ठाणे संपर्काच्या माहितीसह लावण्यात आला होता. मात्र त्या फलकाच्या बाजूलाच मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे असल्याने हा फलक झाडा-झुडपांत हरविल्याची व या मार्गावरून प्रवास करणा-या सर्व वाहन चालकांना व प्रवाशांना हा फलक दिसून येत नव्हता. त्यामुळे याविषयाची बातमी प्रसिध्द झाल्यानंतर फलकाच्या बाजूची झाडे-झुडपे तोडल्याने फलकाने मोकळा श्वास घेतला आहे. आता हा फलक आता प्रवाशांना स्पष्टपणे दिसत आहे.