| पेण | प्रतिनिधी |
थर्टी फस्ट चा विचार करता आणि मागील दोन-तीन वर्षापुर्वीच्या थर्टी फस्ट च्या पार्टीचा विचार करता पेण तालुक्यातील पोलीस यंत्रण अॅक्शन मोड वर आहेत.
पेण पुर्व विभागामध्ये मोठया प्रमाणात फार्महाउस असून यातील काही फार्महाउस वर रम-रमा-रमी ची रेलचेल असते. अक्षरशः 30, 31 आणि 1 तारीख म्हणजे आंबट शौकीनांची पर्वणीच असते. मुजर्या पासून डी.जे. डान्स शो पर्यंत वेगवेगळे फंडे हे फार्म हाउस मालक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वापरत असतात. त्यामुळे कळत न कळत अवैध धंद्यांना तेजी येते. यामध्ये दारु, गांजा, चरस, एम.डी. या प्रकारचे आम्ली पदार्थाचे रेलचेल असते. तसेच मोठ मोठे जुगाराचे अड्डे व या जुगार खेळणार्यांना करमणुक म्हणून नाच गाण्यांचे कार्यक्रम सुध्दा होत असतात. पाच वर्षापूर्वी पुर्व विभागातील एका फार्म हाउस वर रेओ पार्टीचे आयोजन केले होते. परंतु एका बडया राजकीय धेंडयाचा हस्तक्षेप असल्याने त्यावेळी त्याच्यावर कारवाई झाली नाही. मात्र, यावर्षी असा प्रकार घडल्यास खाकीचा ईंगा खादीला पहायला मिळेलच.
पेण येथील वेगवेळया फार्म हाउस वर अवैधपणे गोवा, दमनदिव या भागातून मद्य आणून साठवून ठेवले असल्याची माहिती खास सुत्रांकडून मिळालेली आहे. तसेच कासमाळ परिसरात देखील अवैधरित्या आम्ली पदार्थांची विक्री होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कासमाळ परिसरा बरोबरच मोतिराम तलाव, तांबडी रोड, नांदारीचा धरण, पासोडी, भोगावती नदीचा पात्र, रामवाडी येथील पंचायत समिती कार्यालयाचा परिसर, ट्री हाउस स्कूलकडून शहापाडाकडे जाणारा रस्ता, तसेच शहापाडा धरणाच्या मागील रस्ता जो जिर्णे या गावाकडे जातो. बलवडे मार्गे बद्रुद्दीन कडे जाणारा रस्ता, साकसई किल्ला, बाळगंगा धरणाचे पात्र या भागांमध्ये देखील अवैधरित्या दारू विक्री व गांजा विक्री होण्याची शक्यता असल्याची माहिती खास सुत्रांकडून मिळालेली आहे. या सर्व बाबींचा विचार करता पेण, वडखळ, दादर, पोलीस अलर्ट झाले असून थर्टीफस्ट च्या पार्टींवर कारवाई होणार हे नक्की झाले आहे.