| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपविले. अलिबागमधील राहत्या घरात गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद सोनावणे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. रायगड पोलीस दलात गेली 30 वर्षांहून अधिक काळ त्यांनी सेवा केली आहे. आपल्या कर्तृत्वाने त्यांनी वेगवेगळ्या गुन्ह्यांची उकलदेखील केली आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत ते कार्यरत होते. अलिबागमधील पोलीस मुख्यालयात सध्या ते कार्यरत होते. शनिवार ते रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अलिबागमधील राहत्या घरातील हॉलमधील छताच्या लोखंडी हूकला बेडशिटच्या कपड्याच्या सहाय्याने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली असल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. अरविंद सोनावणे यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, मागील काही महिने ते रजेवर होते. त्यानंतर ते पुन्हा कामावर हजर झाले. पुन्हा रजेवर गेले. पुन्हा कामावर हजर झाले असल्याची चर्चा पोलीस दलात सुरू आहे. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार जे.एच. पाटील अधिक तपास करीत आहेत.
Alibag Suicide: गळफास घेऊन पोलिसाने संपविले जीवन
