। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबागमधील एसटी बसस्थानकात पार्किंग केलेली दुचाकी चोरट्याने गायब केली. पोलीस मुख्यालयातील अधिकार्याची गाडी असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, ती गाडी दोन दिवसांनी दुसर्या जागी सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस मुख्यालयातील राखीव पोलीस उपनिरीक्षक प्रकाश मोकल यांनी त्यांची दुचाकी सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अलिबागमधील एसटी स्थानकात पार्किंग करून ठेवली होती. दुसर्या दिवशी ती दुचाकी त्यांना जागेवर दिसून आली नाही. त्यांनी ठिकठिकाणी शोधाशोध सुरु केली. मात्र, दुचाकी सापडली नाही. त्यामुळे त्यांनी दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार अलिबाग पोलीस ठाण्यामध्ये केली. पोलीस उपनिरीक्षक महाले यांनी तपास सुरु केला. अखेर स्थानकाच्या दुसर्या जागी दुचाकी सापडली असल्याची माहिती अलिबाग पोलिसांनी दिली.