नियमांचे उल्लंघन करणार्यांवर दंडात्मक कारवाई
| म्हसळा | वार्ताहर |
म्हसळा पोलीस ठाण्याचे स. पोलिस निरीक्षक संदीपान सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि विविध प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी सावधगिरी बाळगावी म्हणून ऑलआऊट ऑपरेशन मोहीम राबविण्यात आली. यावेळी विविध प्रकारच्या 15 गुन्हांची तपासणी केली. तपासणी मोहिमेत म्हसळा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या 11 मोटार वाहनांवर कारवाई करून 5500 रुपये आणि 6 कोपटा केस कारवाईत 1200 रुपयांचा दंड मिळून 6700 रुपयांचा दंड वसूल केला, अशी माहिती माहिती संदीपान सोनवणे यांनी दिली.
पोलिसांचे ऑपरेशन ऑलआऊट
