। मुंबई । वृत्तसंस्था ।
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ४ ते ५ साक्षीदारांनी रविवारी आर्थिक गुन्हे शाखेकडे साक्ष नोंदवली आहे. भारतीय नौदलाची विमानवाहू युद्धनौका ‘INS विक्रांत’ वाचवण्यासाठी किरीट सोमय्या यांनी निधी गोळा केला होता. मात्र, हा निधी सोमय्यांनी त्यांच्या व्यवसायासाठी वापरल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय.
याप्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर मुंबईत गुन्हा दाखल झाला असून मुंबईतील ट्रॉम्बे पोलिसांनी आज त्यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, सोमय्या हजर होण्याआधीच त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. किरीट सोमय्यांच्या अटकपूर्व जामिनाला पोलिसांनी विरोध दर्शवला आहे.