। पनवेल । प्रतिनिधी ।
पोलिसांना धक्काबुक्की करून चौकीच्या आवारातील कुंड्या, प्लास्टिकच्या खुर्च्या तसेच चौकीचा काचेचा दरवाजा तोडून नुकसान केल्याप्रकरणी कारचालक शेरबहादूर याच्या विरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय जाधव हे पनवेल वाहतूक शाखेत पोलीस हवालदार असून, ते गस्त करत होते. यावेळी एका कारला त्यांनी हात दाखवून थांबण्याचा इशारा केला. मात्र चालकाने कार जाधव यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी त्याला कोनगाव येथील चौकीच्या आवारात आणले असता त्याने चौकीसमोरील झाडांच्या कुंड्या, प्लास्टिकच्या खुर्च्या तसेच चौकीचा काचेचा दरवाजा तोडून नुकसान केले. या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कारचालकाकडून पोलीस चौकीचे नुकसान
