| उरण | प्रतिनिधी |
उरण नगरपरिषद निवडणुक निकालाची मतमोजणी रविवारी (दि.21) होणार आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी (दि.19) सायंकाळी उरण शहरामर्ध्ये पोलीस प्रशासनातर्फे संचलन करण्यात आले. हे संचलन उरण एसटी स्टँड चार फाटा येथून सूरू होऊन पालवी हॉस्पिटल, कामठा रोड, एन.आय. हायस्कूल समोरून स्वामी विवेकानंद चौक, गणपती चौक, राजपाल नाका मार्गाने उरण कोटनाका येथे समाप्त करण्यात आले. या संचलनामध्ये उरणचे पोलीस निरिक्षक संजय जोशी यांसह 2 सहाय्यक पोलीस निरिक्षक, पोलीस उपनिरीक्षक, 20 पोलीस अंमलदार तसेच पोलीस मुख्यालय येथील क्यूआरटी पथकाचे 1 अधिकारी, 12 पोलीस अंमलदार, आरसीपी पथकाचे 1 अधिकारी व 25 पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला होता. उरण शहरात कोणतेही अनुचित प्रकार होऊ नये, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनिफ मुलाणी यांनी दिली.
उरण शहरात पोलिसांचे संचलन
