। पनवेल । वार्ताहर ।
पोलीस पाटील हे खर्या अर्थाने त्या गावाचे पोलिसच असतात त्यामुळे त्यांनी आपले कर्तव्य बजावताना सतर्क राहणे गरजेचे आहे. गावात काय चाललंय याची माहिती वेळोवेळी घेऊन काही गोष्टी समाज विघातक असल्यास त्याची माहिती नजीकच्या पोलिसांना द्यावी असे आवाहन परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी आज पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंथन सभागृह येथे घेतलेल्या पोलीस पाटलांच्या बैठकीत केले.
या बैठकीला परिमंडळ 2 पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, यांच्यासह सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनावणे, तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौडकर, पोलीस निरीक्षक अंकुश खेडकर, पोलीस उपनिरीक्षक उमेश गुटाळ, गोपनीय विभागाचे सचिन होळकर यांच्यासह तालुका हद्दीतील 32 पोलीस पाटील उपस्थित होते.
पोलीस पाटलांनी सामाजिक भान ठेऊन काम करावे, कोणत्याही अवैध्य गोष्टी होत असल्यास त्याची माहिती पोलीस ठाण्यात द्यावी त्यामध्ये प्रामुख्याने शाळा, कॉलेज परिसरातील बेकायदेशीर गुटखा विक्री, मद्य विक्री, अंमली पदार्थांची विक्री, त्यामुळे तरुण पिढी नशेच्या आहारी जात आहे. तरी अश्या प्रकारच्या कृत्यांना वाव देऊ नये.
शिवराज पाटील, पोलीस उपायुक्त
गावातील चोहोबाजूला सीसीटीव्ही लावण्या संदर्भात आवश्यक त्या सूचना ग्रामपंचायतीला देण्यात आल्या आहेत. ज्या ग्रामपंचायतींची परिस्थिती सीसीटीव्ही उभारण्याची नसेल त्यांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा त्यांना खाजगी संस्थेच्या माध्यमातून मदत करून देण्यात येईल. पोलीस पाटलांचे काम चांगले सुरु असून ते पोलिसांच्या कामाचा भार हलका करीत आहेत.त्यांना काही अडचणी असल्यास त्यांनी थेट संपर्क साधावा असे आवाहन सुद्धा त्यांनी या वेळी केल
वरिष्ठ पोलीस निरीक्ष रवींद्र दौडकर यांनी सांगतिले की, गाव पातळीवर मुके जनावरे चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहेत. तरी या बाबत सर्वानी सतर्कता बाळगावी व कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही या कडे लक्ष द्यावे असे आवाहन त्यांनी केले.







