। अहमदनगर । प्रतिनिधी ।
पोलिसांच्या ताब्यातील मोबाईल परत देण्यासाठी तीन हजारांची लाच घेताना श्रीगोंदे पोलिस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल संभाजी शिवाजी घोडे (32) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
एका प्रकरणात तक्रारदाराच्या मुलाचा मोबाईल संबंधित पोलिसाने ताब्यात घेतला होता. तो मोबाईल परत देण्यासाठी आरोपी घोडे याने तक्रारदाराकडे 20 हजारांची मागणी केली. याबाबत संबंधित व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता तक्रारीत तथ्य आढळून आले. चर्चेनंतर आरोपी घोडेने तीन हजारांची मागणी केली. मंगळवारी (दि. 13) दुपारी शहरात तीन हजार रुपयांची लाच घेताना घोडे याला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी श्रीगोंदे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संभाजी घोडे याला ताब्यात घेतले आहे.
लाच घेताना पोलीस कर्मचारी ताब्यात
