नेरुळमधील बारवर पोलिसांचा छापा

| पनवेल | प्रतिनिधी |

नेरुळ शिरवणेतील क्रेझी स्टार बार ॲण्ड रेस्टॉरंट या लेडीज बारवर कोपरखैरणे पोलिसांनी पहाटे अडीचच्या सुमारास छापा मारुन महिला वेटरसह बारमधील मॅनेजर, वेटर आणि ग्राहक अशा एकूण 33 जणांना ताब्यात घेतले आहे. निर्धारित वेळेपेक्षा अधिकवेळ हा बार सुरु असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

शिरवणे सेक्टर-1 मधील क्रेझी स्टार बार ॲण्ड रेस्टॉरंट हा लेडीज बार परवानगीपेक्षा जास्तवेळ सुरु असल्याची माहिती परिमंडळ-1 चे पोलिस उपआयुक्त विवेक पानसरे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी कोपरखैरणे पोलिसांना शहानिशा करून नेरूळमधील सदर बारवर कारवाई केली होती. बारमधील महिला बीभत्स वर्तन व अश्लील हावभाव करत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे बारमधील व्यवस्थापक व इतर कर्मचारी यांनी ऑर्केस्ट्रा परवाना अटी व शर्तीचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी 12 महिला वेटर, 6 बारमधील व्यवस्थापक, खजिनदार, वेटर तसेच 15 ग्राहक अशा एकूण 33 जणांवर कारवाई केली आहे.

Exit mobile version