| म्हसळा | प्रतिनिधी |
म्हसळ्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ विद्यालयात शनिवारी (दि.3) पोलीस रायझिंग डे साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म्हसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे यांनी आपल्या मनोगतात महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवसाचे महत्त्व व माहिती करून दिली. त्याचबरोबर पोलीस खात्यातील विविध पदांची माहिती देऊन ब्रीदवाक्याचा अर्थ सांगितला. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विषयी माहिती दिली आणि या दिवसानिमित्त विद्यार्थ्यांना विविध शस्त्र व पिस्तूल, कार्बाइन, ॲक्शन पंप मशीन अशा विविध बंदुकींची ओळख करून दिली. तसेच, मंचावर विविध प्रकारच्या बंदूक ठेवून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली. यावेळी म्हसळा पोलीस ठाण्याचे हवालदार दिलीप राठोड, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय पुरी, महिला पोलिस कॉन्स्टेबल सोनवणे, पर्यवेक्षक जे.के. मांजरेकर, ज्येष्ठ शिक्षक ई.सी. पाटील, गर्जे, मोरे, शिर्के, पाटील, आमले, सहारे, वसावे व विद्यार्थी उपस्थित होते.
म्हसळ्यात पोलीस रेझिंग डे साजरा
