पोलीसांचा अहवाल, सामान्याचे ठिकाण बदलले

बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारत आणि इंग्लंड यांच्यात जानेवारी 2025 मध्ये पाच टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी-20 सामना 22 जानेवारी रोजी चेन्नई येथे होणार होता. मात्र आता त्याचे ठिकाण बदलले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सांगितले की, या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांची ठिकाणे बदलण्यात आली आहेत. कोलकाता पोलिसांच्या आवाहनानंतर हा बदल करण्यात आला आहे. बीसीसीआयने बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणार्‍या टी-20 सामन्याचे ठिकाणही बदलले आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना कोलकाता येथे तर दुसरा सामना चेन्नईमध्ये होणार होता. पण आता त्याच्या ठिकाणात बदल करण्यात आला आहे. याबाबत कोलकाता पोलिसांनी बंगाल क्रिकेट असोसिएशनकडे मागणी मागितली होती. प्रजासत्ताक दिनानिमित्त कोलकाता पोलीस तयारी करणार आहेत. पहिला टी-20 सामना 22 जानेवारीला होणार आहे. आता हा सामना चेन्नईऐवजी कोलकात्यात होणार आहे. दुसरा सामना 25 जानेवारीला कोलकाताऐवजी चेन्नईत खेळवला जाईल.

बीसीसीआयने आपल्या अधिकृत वेबसाईटवर नवीन वेळापत्रक शेअर केले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा टी-20 सामना 28 जानेवारीला राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. चौथा सामना 31 जानेवारीला पुण्यात होणार आहे. पाचवा सामना 2 फेब्रुवारीला मुंबईत होणार आहे. एकदिवसीय मालिकेबद्दल बोलायचे झाले तर पहिला सामना नागपुरात 6 फेब्रुवारीला होणार आहे. दुसरा सामना 9 फेब्रुवारी रोजी कटक येथे खेळवला जाईल. तिसरा सामना 12 फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये होणार आहे.

भारत-बांगलादेशची मालिका-
भारत आणि बांगलादेश यांच्यात 19 सप्टेंबरपासून कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्यानंतर टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला टी-20 सामना धर्मशाला येथे होणार होता. मात्र आता त्याचे ठिकाण बदलण्यात आले आहे. हा सामना मध्य प्रदेशमधील ग्वालियर मैदानावर होणार आहे.
भारत-इंग्लंड मालिकेचे वेळापत्रक-
टी-20 मालिका वेळापत्रक-
पहिला टी 20 सामना : 22 जानेवारी 2025 ,कोलकाता
दुसरा टी 20 सामना : 25 जानेवारी 2025, चेन्नई
तिसरा टी 20 सामना : 28 जानेवारी 2025, राजकोट
चौथा टी 20 सामना : 31 जानेवारी 2025, पुणे
पाचवा टी 20 सामना : 02 फेब्रुवारी 2025, मुंबई
एकदिवसीय मालिका वेळापत्रक-
पहिला एकदिवसीय सामना : 6 फेब्रुवारी 2025, नागपूर
दुसरा एकदिवसीय सामना : 9 फेब्रुवारी 2025, कटक
तिसरा एकदिवसीय सामना :12 फेब्रुवारी 2025, अहमदाबाद
Exit mobile version