कोकण परिक्षेत्रात पोलिस दलात फेरबदल

रायगडातील पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यासह कोकण परिक्षेत्रातील पोलिस अधिकार्‍यांच्या प्रशासकीय तसेच विनंतीनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. 15 पोलिस निरीक्षक, 15 सहायक पोलिस निरीक्षक, 36 पोलिस उपनिरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील चार पोलिस निरीक्षक, दोन सहायक पोलिस निरीक्षक तसेच 9 पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या जिल्ह्याबाहेर करण्यात आल्या आहेत. पोलिस निरीक्षक परशूराम कांबळे यांना 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून रविंद्र शिंदे, दादासाहेब घुटकडे, सुजाता तानवडे, यांच्या रत्नागिरी आणि नामदेव बडंगर यांची पालघर जिल्ह्यात तर देवेंद्र पोळ, राजेंद्र पाटील आणि अनिल लाड यांची रत्नागिरीहून रायगडमध्ये, तसेच गोविंद ओमासे यांची पालघरहून रायगडमध्ये बदली करण्यात आली आहे.
तर सहायक पोलिस निरीक्षक धर्मराज सोनके यांची ठाणे ग्रामीणमध्ये तसेच सागर कावळे यांची पालघर जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. तसेच सुशांत वराळे यांची रत्नागिरीहून तर योगेश जाधव, चंद्रकांत लाड यांची सिंदुदूर्गातून रायगडमध्ये बदली करण्यात आली आहे. मोठया प्रमाणावर उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात शरद देठे, रविंद्र शेंगडे यांची सिंधुदूर्ग तसेच नरेंद्र पाटील, प्रियंका बुरुंगले, दिपक ढुस यांची पालघर जिल्ह्यात, हर्षद हिंगे, राजेंद्र सुर्वे यांची रत्नागिरी तर महेश कदम, प्रिती आढावे यांची ठाणे ग्रामीणमध्ये बदली करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ठाणे ग्रामीण येथील प्रदिप आरोटे, पालघरमधील अविनाश ढाकरे, अरुण भिसे, सरिता मनवर, रत्नागिरीहून समस बेग, महेश धोंडे, विकास चव्हाण, अस्मिता पाटील, शहानवाज मुल्ला यांची रायगडमध्ये बदली करण्यात आली आहे. तर एक सहायक पोलिस निरीक्षक, तिन उपनिरीक्षकांची बदलीची विनंती अमान्य करण्यात आली.

Exit mobile version