| रसायनी | वार्ताहर |
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रसायनी पोलीस ठाण्याच्यावतीने वरिष्ठांच्या आदेशान्वये रसायनी परिसरात विविध भागात रुट मार्च करण्यात आला.
रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली एसआरपीएफचे जवान व रसायनी पोलिसांचा ताफा रुट मार्चमध्ये सामील झाला होता. यावेळी पोलिसांची शिस्तबद्ध परेड मोहोपाडा अचानक मैदानावरुन मोहोपाडा मार्केट, मोहोपाडा गाव, नवीन पोसरी व वावेघर असा रुट मार्च काढण्यात आला.