हरवलेल्या मुलाला शोधण्यात पोलीसांना यश

| माणगाव | वार्ताहर |

माणगाव पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी करीत हरविलेल्या अडीच वर्षीय मुलाचा शोध घेऊन त्याला सुखरूपपणे पालकांच्या ताब्यात दिल्याने पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे तालुक्यातून कौतुक होत आहे.

याबाबत अधिक वृत्त असे कि, मंगळवार दि.17 रोजी रात्री 9:50 वाजता राहुल बेचैन गुप्ता (32) रा.माणगाव पोस्ट कार्यालयाजवळ, मोर्बा रोड, ता. माणगाव, त्यांचा मुलगा जिगर गुप्ता, वय-अडीच वर्षे हा घरातून हरवल्याबाबत तक्रार माणगाव पोलीस ठाण्यात देण्यात आली. सदर घटना कळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून रामनाथ डोईफोडे, मयूर पाटील, पोलीस शिपाई, जाधव, सोनकांबळे, साबळे यांनी हरवलेल्या मुलाचा शोध घेणे कामी तात्काळ माणगाव शहरात रवाना झाले. सदर हरवलेला मुलगा रात्री 10:15 वाजता माणगाव एसटी बस स्थानक येथे मिळून आला. सदर हरविलेल्या मुलास माणगाव पोलीस ठाणे येथे आणून त्याला सुखरूपपणे त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.

Exit mobile version