| महाड | प्रतिनिधी |
महाड नगरपालिकेचा एक नगराध्यक्ष व 20 सदस्यांसाठी रविवारी (दि.21) मतमोजणी होणार आहे. ही मतमोजणी महाड नगरपालिकेच्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर 10 टेबलवरुन होणार आहे. त्यासाठी प्रशासन व पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून सकाळी 9 वाजता निकाल प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. या प्रक्रियेला निवडणूक निरीक्षक प्रतिमा पुदलवाड यांच्या नियंत्रणाखाली निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार महेश शितोळे यांच्या उपस्थितीत सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी एकूण 26 मतदान केंद्रांवर 6 प्रभागात 3 मतदान केंद्र व 4 प्रभागात 2 मदान केंद्रावरुन एकूण 16,426 एवढे मतदान झाले आहे. त्यामुळे 6 प्रभागांचे तिन फेऱ्यांमधुन व 4 प्रभागात 2 फेऱ्यांमधुन निकाल घोषीत होणार आहेत. पोलीस उपविभागीय अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 8 चे युनिट तैनात करण्यात आले आहे.
महाडमध्ये पोलीस यंत्रणा सज्ज
