रसायनीत पोलीस काका-दीदी संकल्पना

। रसायनी । वार्ताहर ।
रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सारसई विभाग बागाची आदिवासी वाडीतील रा.जि.प. प्राथमिक शाळेत पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थी व शिक्षक यांना पोलीस काका व पोलीस दीदी संकल्पनेबाबत माहिती देण्यात आली. रसायनी पोलिस ठाणे व अभिजित पाटील मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बागेची आदीवासीवाडी राजिप शाळेत यानिमित्ताने वह्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रसायनी पोलिसांकडून बालकाविषयी कायदे, डायल 112, बाबत सविस्तर माहितीही देण्यात आली. याप्रसंगी रसायनी पोलीस ठाण्याचे कैलास डोंगरे, ऑल इंडिया पोलिस जनसेवा संघटनेचे सचिव गणेश थोरवे, जिल्हा अध्यक्ष सागर कुरंगळे, पोलीस नाईक विशाल झावरे,अमितकुमार चव्हाण, ताराचंद राठोड, राजेश भोवड, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष शिंगाडे आदी उपस्थित होते.

Exit mobile version