| पनवेल | वार्ताहर |
डंपरने धडक दिल्यामुळे दुचाकीवरील पोलीस जखमी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावीर लुबाळ हे तळोजा फेस टू येथे राहत असून, ते शीळ डायघर पोलीस ठाणे येथे रात्रपाळी करून घरी दुचाकीवरून जात होते. मुंब्रा ते पनवेल मार्गावरील धानसर टोल नाक्याजवळील शुभम गोडाऊनच्या समोर आले असता पाठीमागून आलेल्या डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्या धडकेत ते खाली पडले आणि त्यांचे छातीला व पायाला दुखापत झाली आहे.






