भारत- अफगाण दौऱ्याच्या प्रसारण हक्काबाबत लवकरच धोरण

जय शाह यांची माहिती

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारतीय संघाचे यावर्षीचे खेळाचे वेळापत्रक खूपच व्यस्त ठेवण्यात आले आहे. वेस्ट इंडिज, आयर्लंड,ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघ खेळणार आहे. तसेच 2023 चा विश्वचषकही भारतात होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध मालिका खेळणार आहे. एक भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात जानेवारी 2024 मध्ये मालिका खेळवली जाणार आहे. अफगाणिस्तान मालिका तसेच मीडिया हक्कांबाबत ऑगस्टच्या अखेरीस क्रिकेट सामन्यांच्या अधिकार निश्चित केले जातील, असे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी जाहीर केले आहे.

2023 विश्वचषकापूर्वी सप्टेंबरमध्ये प्रस्तावित असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एक दिवसीय मालिकेचाही समावेश असेल. विश्वचषकानंतर उभय संघांमध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. भारतीय पुरुष आणि महिला संघ हांगझू आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पाठवला जाईल. ते म्हणाले की, अ संघ आणि ब संघात फरक राहणार नाही. शाह म्हणाले, आम्ही आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार आहोत. सर्वोच्च परिषदेने आमच्या पुरुष आणि महिला संघांच्या सहभागास मान्यता दिली आहे. भारतीय डोमेस्टिक सर्किट आणि इंडियन प्रीमियर लीगमधून खेळाडूंना निवृत्त होण्यापासून रोखण्यासाठी बोर्ड लवकरच एक धोरण घेऊन येईल, असे बीसीसीआय सचिवांनी सांगितले.

आम्ही पूर्वनिर्धारित निवृत्तीची ही प्रथा बंद करण्यासाठी धोरण तयार करू. अधिकारी एक धोरण तयार करतील आणि मंजुरीसाठी पाठवतील.बीसीसीआय सचिव म्हणाले की क्रीडा व्यवस्थापन फर्म ग्रँट थॉर्नटनने विश्वचषकाचे आयोजन करणाऱ्या 12 पैकी 10 स्टेडियमचे अपग्रेड आणि दुरुस्ती करण्यासाठी त्यांच्या सूचना पाठवल्या आहेत.

जय शाह, बीसीसीआय सचिव

महिला संघाला कोचिंग स्टाफ
शाह म्हणाले की, आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी भारतीय वरिष्ठ महिला संघाला मुख्य प्रशिक्षकासह प्रशिक्षक कर्मचारी मिळतील. क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) शिफारस केल्यानुसार अमोल मजुमदार यांचे नाव न घेता, ते म्हणाले की संघाने नाव निश्चित केले आहे. ते म्हणाले, सीसीएसीने मुख्य प्रशिक्षकाच्या नावाची शिफारस केली आहे. ते फलंदाजी आणि गोलंदाजी प्रशिक्षकाचीही मुलाखत घेतील. आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी आम्ही सर्व प्रशिक्षकांची नावे जाहीर करू.

Exit mobile version