माथेरानमध्ये राजकीय रणधुमाळी

पालिका पार्श्‍वभूमीवर अफवांना उत
| माथेरान | वार्ताहर |
माथेरान नगरपालिकेच्या सभागृहाचा कार्यकाळ संपून येथे प्रशासकीय राजवट सुरू आहे, परंतु लवकरच केव्हाही निवडणुका जाहीर होतील, यामुळे माथेरानमधील राजकारण वातावरण हळूहळू गरम होऊ लागले आहे. यावेळी पहिल्यांदाच राजकीय पक्षांबद्दल वेगवेगळ्या अफवांच्या कडीला ऊत आलेले सध्या पहावयास मिळत आहे. माथेरान नगरपालिकेवर सत्ता मिळविण्याकरिता येतील सर्वच पक्षांनी कंबर कसली असून, सध्या तरी सर्वच राजकीय पक्ष एकला चलो रे ची भूमिका दाखवत असले तरी आतून छुप्या पद्धतीने एकमेकांशी संधान बांधून असल्याचे चित्र दिसत आहे.

परंतु, कोणताही राजकीय पक्ष या गोष्टी मानण्यास तयार नाही. मागील काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी व उद्धव ठाकरे शिवसेना गट यांनी एकत्रित येऊन येथील एकहाती सत्ता स्थापन केली होती व त्यांच्या विरोधामध्ये बाळासाहेबांची शिवसेना, भाजप, राष्ट्रीय काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र येऊन निवडणुकीत सामोरे गेले होते; परंतु या तिन्ही पक्षांना पराभवास सामना करावा लागला होता, त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीमध्ये हे तिन्ही पक्ष एकत्र असतील का, असा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. परंतु मागील दिवसांमध्ये दोन्ही शिवसेना माथेरानमध्ये एकत्र येणार या अफवेने राजकीय खळबळ माजली आहे. दोन्ही पक्षांमध्ये खलबते सुरू असून, गुपचूप गाठीभेटीही झाल्या अशा प्रकारच्या अफवा माथेरानमध्ये पसरल्याने सर्वत्र एकच खळबळ माजली आहे.

दरम्यान, सर्वच पक्षांनी आपापल्याकडून नगराध्यक्षपदासाठी दावेदारी दाखल केल्यामुळे माथेरानमध्ये राजकीय पक्षांमध्ये युती-आघाडीचे राजकारण होणार का, असा प्रश्‍नही निर्माण झाला कारण यावेळी अनेकांना नगराध्यक्ष पदाची स्वप्ने पडू लागल्याने सोप्या पद्धतीने का होईना आपला उमेदवार कसा अधिक चांगला आहे हे पटवून देण्यासाठी सामान्य कार्यकर्त्यांना पुढे केले जात असल्याचे सध्यातरी चित्र दिसत आहे. दरम्यान, या अफवांच्या बाजारामुळे नागरिकांचे मात्र मनोरंजन व निष्ठावंत कार्यकर्त्यांचे हाल होत असल्याचे पहावयास मिळत आहे.

Exit mobile version