जळगावात राजकीय भूकंप

। जळगाव । वृत्तसंस्था ।
जळगाव महापालिकेत राजकीय घडामोडी घडत असून महासभेत भाजपच्या सदस्यांनी जोरदार हल्ला करत शिवसेनेचा स्विकृत नगरसेवक सदस्य निवड थांबवून महासभा शिवसेनेला तहकुब करावी लागली. आणि काही वेळातच भाजपचे बंडखोर 10 नगसेवकांनी जी. एम. फाउंडेशन कार्यालयात आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश केल्याने शिवसेनेला आज दुसरा धक्का देत महापालिकेत आता भाजपने आपली संख्याबळ वाढविले आहे.

भारतीय जनता पार्टीचे 27 नगरसेवकांनी बंडखोरी करून शिवसेनेत प्रवेश केला होता. काही महिने उलटत नाही तोच दोन-तीन दिवसापूर्वी 3 बंडखोर नगसेवकांनी भाजपात प्रवेश केला होता. आज पून्हा 10 बंडखोर नगरसेवकांनी घरवापसी करत भाजपात प्रवेश केला. अजून बंडखोर नगरसेवक पून्हा भाजपात येणार असल्याने भाजपचे संख्याबळ आता 43 झाले आहे. त्यामुळे आधीच गटनेता, उपगटनेता पदाच्या खुचर्वीरून भाजप, शिवसेनात रस्सीखेच सुरू असतांना भाजपचे संख्याबळ वाढल्याने पून्हा नवीन राजकीय समिकरणे जुळल्याने महापौर, उपमहापौर पदासाठी चुरूस जळगाव महापालिकेत पाहायला मिळणार आहे.

Exit mobile version