खालापुरात 12 ग्रा.पं.वर महिलाराज

थेट सरपंचदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष; राजकीय पक्षांनाही लागली उत्सुकता

| खोपोली | प्रतिनिधी |

दिवाळीला एक महिना अवकाश असला तरी तालुक्यात 22 ग्रामपंचायतींसाठी होत असलेल्या निवडणुकांमुळे फटाके अगोदरच फुटणार आहेत. सर्वाधिक उत्पन्नाच्या सावरोली, वासांबे, तांबाटी ग्रामपंचायतीत प्रचाराचा धुरळा उडणार आहे. तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींवर महिला सरपंच विराजमान होणार आहेत. यामुळे या निवडणुकांकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
सरपंचपदासाठी तांबाटी, जांभिवली (छत्तीशी), ठाणेन्हावे, होनाड, वावर्ले, वरोसे, बोरगाव (खु.), जांबरूग, वासंबे, चांभार्ली, सावरोली, शिरवली (छत्तीशी) ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण, ठाणेन्हावे, वावर्ले, वरोसे, बोरगाव, जांबरूग, वासांबे ग्रामपंचायतीत ओबीसी महिला, माजगाव, चिलठण, नारंगी अनुसूचित जाती, तर नंदनपाडा, मानकिवली, इसांबे, कुंभिवली, आत्करगाव, खानाव, बीडखुर्द अनुसूचित जमाती असे सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. त्यानुसार तालुक्यातील तांबाटी, जांभिवली (छत्तीशी) वासांबे, चांभार्ली, नंदनपाडा, ठाणेन्हावे, होनाड, वावर्ले कुंभिवली, आत्करगाव, वरोसे, बोरगाव (खु) जांबरुग, माणकिवली, नारंगी, शिरवली (छत्तीशी) बीडखुर्द या ग्रामपंचायतींमध्ये महिलांना संधी मिळणार आहे. ऑक्टोंबर हिटमध्ये निवडणुकीमुळे वातावरण अधिकच तापणार आहे. शिवसेना,

Exit mobile version