दापोलीत भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने
| दापोली | वृत्तसंस्था |
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या दापोली दौर्यावरुन कोकणात राजकीय वातावरण तापलं आहे. परिवहनमंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांचं दापोली तालुक्यातील मुरूड इथलं रिसॉर्ट बेकायदा असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. याचसंदर्भात किरीट सोमय्या कोकण दौर्यावर आहेत.
दरम्यान, हिंमत असेल तर रिसॉर्ट तोडून दाखवा असं आव्हान परिवहनमंत्री अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांना दिलं आहे. रिसॉर्ट तोडायला सोमय्या पालिकेचे कर्मचारी आहेत का? रिसॉर्ट बेकायदेशी आहे ते ठरवणारे हो कोण? असे सवाल विचारत अनिल परब यांनी किरीट सोमय्या फक्त नौटंकी करत असल्याचं म्हटलं आहे.







