मराठा आरक्षणावरून राजकरण पेटले

| मुंबई | प्रतिनिधी |

मराठा आरक्षणावरून राजकरण पेटल्याचा प्रत्यय विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात दिसून आला. सरकार बॅकफूट गेले आहे. असे चित्र निर्माण झाले आहे. या मुद्द्यावरून विधानसभेचे कामकाज तब्बल चार वेळा तहकूब करण्यात आले. त्यानंतर विधानसभा आणि विधानपरिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूक करण्यात आले.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावर बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. मराठा आणि ओबीसी समाजात महायुतीने तेढ निर्माण केले आहे. आरक्षणाचा प्रश्‍न या सरकारला सोडवायचा नाही. हे आता स्पष्ट झाले आहे. सरकारने सभागृहात भूमिका स्पष्ट करणे अपेक्षित आहे. त्यामुळे जनतेला आरक्षणाबाबतची माहिती मिळू शकते. परंतु, सरकारला जनतेला अंधारात ठेवायचे आहे. म्हणून आरक्षण प्रश्‍नावर सरकार सभागृहात बोलत नाही. खरं तर, आरक्षणाचा प्रश्‍न सोडविण्याची या सरकारची इच्छाशक्ती नाही. त्यामुळे महायुतीने सत्तेतून बाहेर पडावे, अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

सरकारने आंदोलकांना काय आश्‍वासन दिले हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगितले नाही. मुख्यमंत्री अधिवेशन सुरू असताना आरक्षणप्रश्‍नी बैठक बोलावतात. त्यापेक्षा त्यांनी केलेल्या भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांना आम्ही वाचा फोडत आहोत, त्यामुळे गोंधळ घालून काम बंद पाडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
महायुतीचे पितळ उघडे पडेल या भीतीने महाविकास आघाडीच्या नेत्यांना बोलू दिले जात नाही. अपयश लपवण्यासाठी सरकारचा हा थयथयाट सुरू आहे. महायुतीत 200 च्या वर आमदार आहेत. तरीदेखील आरक्षाचा प्रश्‍न महायुती सरकार सोडवत नाही. उलट, सभागृहात गोंधळ घालून कामकाज बंद पाडले जात आहे. विरोधी पक्षाला सभागृहात बोलू दिले जात नाही, असेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

Exit mobile version