वृक्षारोपणातून प्रदूषण नियंत्रण शक्य – डॉ. मेधा सोमैया यांचे प्रतिपादन

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
वृक्षारोपणातून प्रदूषण नियंत्रण शक्य आहे, असे प्रतिपादन जनशिक्षण संस्थानच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा सोमैया यांनी केले. रविवार, दि. 31 जुलै रोजी श्रमदानाच्या माध्यमातून सहाण टेकडी-आदिवासी वाडी परिसरात जन शिक्षण संस्थान रायगड कर्मचार्‍यांच्या व व्यवस्थापन मंडळाच्या माध्यमातून उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. सर्वप्रथम उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. सर्व ग्रामस्थांनी गाव विकासासाठी वृक्षारोपण करावे, असे आवाहन अध्यक्ष डॉ. नितीन गांधी यांनी केले.

याप्रसंगी संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा किरीट सोमैया, अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, उपाध्यक्ष गीतांजली ओक, सहान उपसरपंच नरेश वर्तक, नरेन जाधव, प्रा. अविनाश ओक, अ‍ॅड. नीला तुळपुळे, रत्नप्रभा बेल्हेकर, जन शिक्षण संस्थान रायगडचे संचालक विजय कोकणे आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version