| खोपोली | प्रतिनिधी |
गेल्या काही वर्षांपासून गोळेवाडी मार्गे खानाव, भोकरपाडा, नारंगी गोरठण अशा अनेक गाव आणि वाड्यांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे जवळपास पाच ते सहा किलोमीटर अंतराच्या मार्गावरून प्रवास करणे सर्वांनाच जिकरीचे बनले आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने या रस्त्याचे गांभीर्य घेत त्याची दुरूस्ती करूप हा मार्ग लवकरात लवकर खड्डेमुक्त करा, अशी मागणी प्रवासी वर्गातून व्यक्त होत आहे.
खालापूर तालुक्यातील गोळेवाडी, खानाव मार्गे भोकरपाडा, नारंगी गोरठण अशा अनेक गाव आणि वाड्यांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. या मार्गावरुन अनेक शाळकरी विद्यार्थी, नागरिक व चाकरमानी दररोज प्रवास करीत असल्याने या मार्गावर मोठी वर्दळ असते. परंतु, या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. जास्तीकरून दुचाकींचे मोठ्या प्रमाणात अपघात होताना दिसत आहेत. तसेच, चारचाकी वाहनांना देखील खड्डे चुकवताना तारोवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या रस्त्यांबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने या मार्गाकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन रस्ता खड्डेमुक्त करा, अशी मागणी सध्या जोर धरत आहे.
गोळेवाडी मार्गे खानाव, भोकरपाडा, नारंगी, गोरठण अशा अनेक गाव आणि वाड्यांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची खड्डेमय अवस्था झाल्याने जवळपास चार ते पाच किलोमीटर अंतरापर्यत प्रवास करणे जिकरीचे बनत आहे. त्यामुळे हा खड्डेमय रस्ता अपघाताला आमंत्रण देत आहे. संबंधित प्रशासनाने याचे गांभीर्य घेत हा मार्ग खड्डेमुक्त बनवावा, जेणेकरून सर्वांचा प्रवास सुखाचा बनेल.
-शांताराम पाटील,
शेकाप नेते







