| वाकण | वार्ताहर |
नागोठणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सभागृह व लॅब ची दुरावस्था झाली असून याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर म्हात्रे यांनी नाराजी व्यक्त करून प्रा. आ. केंद्राची झालेली दुरावस्था पत्रकारांच्या निदर्शनास आणून दिली. केंद्रातील दुरवस्थेवर लवकरच उपाययोजना न केल्यास जन आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी किशोर म्हात्रे यांनी दिला आहे.
नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील सभागृह व लॅबची सामाजिक कार्यकर्ते किशोरभाई म्हात्रे, रोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणपतशेठ म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते गोरखनाथ पारंगे, विकी म्हात्रे, रोशन दाभाडे, र.य.पाटील(गुरुजी), राजेश गायकवाड , नजिर युनूस सय्यद , अनिकेत म्हात्रे, प्रल्हाद पारंगे, प्रकाश पारंगे, संदीप पाटील,मोरेश्वर म्हात्रे आदींनी पाहणी केली असता सभागृहाचा स्लब पुर्णपणे गळत असून लादीवर पाणी साचलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. लॅब मध्ये तर पाणी गळत असलेल्या ठिकाणी बालदी ठेवण्याची वेळ येथील कर्मचार्यांवर येत आहे.