रस्त्याच्या साईडपट्ट्यांचे काम निकृष्ट दर्जाचे – बाबा दांडेकर

Exif_JPEG_420

| कोर्लई | वार्ताहर |
मुरुड शहरात अंजूमन इस्लाम हायस्कूल ते चिखलपाखाडीदरम्यान रस्त्यावरील करण्यात येणार्‍या साईडपट्ट्यांचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून, सदर काम नगरपरिषदेने थांबविण्यात येऊन संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक अविनाश उर्फ बाबा दांडेकर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका चिटणीस विजय पैर यांनी केली आहे.

शहरामध्ये करण्यात येत असलेली रस्त्याच्या साईडपट्ट्यांची कामे टेंडर नोटीस व वर्क ऑर्डरप्रमाणे होत असल्याबाबत बाबा दांडेकर यांनी शंका व्यक्त करीत या कामात अक्षरशः समुद्रावरील पुळण (वाळू) वापरली जात आहे. वाळू उपसा बंदी असतानादेखील सर्रासपणे वापर होत असताना याकडे दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

रस्त्याच्या साईडपट्ट्यांचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत तसेच या कामात काँक्रिट न टाकता खाली मोठे दगड टाकण्यात येऊन फसवणूक केली जात आहे. ही बाब न.प.च्या संबंधित इंजिनिअरच्या निदर्शनास आणून दिली असता, सदर काम करणारे कामगार आपले ऐकत नसल्याचे सांगितले. यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरामध्ये सदर ठिकाणी होणारे साईड्पट्याचे काम तातडीने थांबविण्यात येऊन संबंधित ठेकदारावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी बाबा दांडेकर व विजय पैर यांनी केली आहे.

Exit mobile version