पोर्ट महासंघाची वेतनवाढीची बैठक

। उरण । वार्ताहर ।
अखिल भारतीय पोर्ट महासंघाच्या वेतन कराराची पहिली सभा 23 ऑगस्ट 2022 रोजी नवी दिल्ली येथे आयपीएचे चेअरमन जलोटा यांच्यासोबत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेमध्ये जेएनपीटी बंदरातील राष्ट्रीय कामगार नेते सुरेश पाटील व इतर सहा महासंघाचे वेतन कराराचे सदस्य यांनी सहभाग घेतला. या सभेमध्ये मागणी पत्रावर मॅनेजमेंटने दिलेल्या जाचक मार्गदर्शक तत्वे मागे घ्या, अशी मागणी करण्यात आली. तसेच या मीटिंगमध्ये भारतीय मजदूर संघाने कामगारांना कॅफेटरिया मिळाला पाहिजे.

अशी मागणी सुद्धा केली. मागील वेतन करारातील कामगारांच्या हिताचे राहिलेले पेंडिंग विषयी स्थानिक व्यवस्थापनाशी चर्चा करून सोडवावेत, अशी सूचना चेअरमन यांनी केली. तसेच ज्या संघटनेला पोर्टमध्ये ऑफिस नाही त्या संघटनेला ते ऑफिस मिळाले पाहिजे अशी मागणी केली. या मीटिंगमध्ये कामगारांना बोनस लवकरात लवकर देण्याचे मान्य झाले. जेएनपीटीतील भारतीय मजदूर संघाचे वेतन कराराचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रीय कामगार नेते सुरेश पाटील आणि गोपी पटनायक- विशाखापट्टणम तसेच इतर महासंघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Exit mobile version