दिल्ली दरबारात पोर्ट कामगारांचा एल्गार

| उरण | प्रतिनिधी |

भारतीय पोर्ट अँड डॉक मजदूर संघाने दिल्लीतील सत्ताकेंद्रात पोर्ट कामगारांच्या न्याय हक्कांसाठी ठणकावून आवाज उठवला. केंद्रीय पोर्ट व शिपिंग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची दिल्लीतील ट्रान्सपोर्ट भवन भेट घेत कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर थेट जाब विचारण्यात आला. या भेटीत पोर्ट महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश पाटील, राष्ट्रीय कोषाध्यक्ष सुधीर घरत, अध्यक्ष श्रीकांत राय यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. वेतन करारातील वर्षानुवर्षे रखडलेले मुद्दे, द्विपक्षीय वेतन करार समितीच्या सब-कमिटीचा अहवाल तात्काळ अंमलात आणण्याची ठाम मागणी यावेळी करण्यात आली.

Exit mobile version