सर्वांगीण विकासात पॉस्कोचे भरीव योगदान

RAIGAD, INDIA - JANUARY 24: An employee looks at the Posco Maharashtra Steel plant, at Vile Bhagad MIDC Industrial Area on January 24, 2013 Taluka Mangaon of District Raigad, India. (Photo by Abhijit Bhatlekar/Mint via Getty Images)

अडचणीच्या काळात जपले सामाजिक दायित्व
लोकोपयोगी कामांसाठी प्रशासकनाची भरीव मदत
माणगाव | वार्ताहर |
माणगाव तालुक्यातील विळे भागाड औद्योगिक क्षेत्रातील प्रख्यात पॉस्को महाराष्ट्र स्टील कंपनीने आपले दर्जेदार उत्पादन सुरु केले असून, या उत्पादनातून मिळणार्‍या नफ्यातील काही हिस्सा सामाजिक दायित्वासाठी खर्च केला जात असून, यातून अनेक विविध लोकोपयोगी विकासकामे करण्यासाठी कंपनी प्रशासन मदतीचा हात पुढे देत आहे.
नैसर्गिक आपत्ती, कोरोना महामारीचे संकट असो की अन्नधान्याचा प्रश्‍न असो, नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी पॉस्को प्रशासनाने सामाजिक दायित्वाचा हात पुढे केला आहे. नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणार्‍या पॉस्को महाराष्ट्र स्टील कंपनीने माणगाव तालुक्यातच नव्हे तर, महाराष्ट्र सह देशाच्याही प्रगतीसाठी भरीव मदतीचा हात दिला. त्यामुळे या कंपनीला आता लोकप्रियता मिळू लागली आहे.
रायगड जिल्ह्यातील विळे भागाड एमआयडीसी परिसरात स्थित असलेल्या पोस्कॉ महाराष्ट्र स्टीलद्वारे उच्च प्रतीच्या स्टीलची (गॅलवनाईज्ड व गॅलवा अनिल्ड) निर्मिती केली जाते ज्याचा वापर सर्वप्रकारच्या औद्योगिक क्षेत्रात, बांधकाम क्षेत्रात, घरगुती उपकरणे व वाहन उद्योगासाठी केला जातो. या कंपनीने तीन वर्षापासून त्यांच्या सीएसआर उपक्रमाअंतर्गत स्थानिकांचे जीवनमान उंचवण्यासाठी सातत्याने अथक परिश्रम घेतले जात आहेत. महाराष्ट्र सरकारला कोविड महामारीच्या काळात सहकार्य व्हावे यासाठी वर्ष 2020-2021 मध्ये एकूण चार कोटींचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 व जिल्हा आपत्ती सहाय्यता निधीस पोस्कॉ कंपनीद्वारे देण्यात आला आहे. पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीद्वारे त्यांच्या सामाजिक दायित्व उपक्रमा अंतर्गत कोविड महामारी तसेच नैसर्गिक आपत्ती दरम्यान विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत. कंपनीने दिलेल्या भरीव योगदानाची दखल घेत रायगड जिल्हा परिषदेद्वारे कंपनीच्या टीमला गौरविण्यात आले.

Exit mobile version