पोषण अभियान जन आंदोलन कार्यक्रम

सर्वोत्कृष्ट सहभागाबद्दल रायगड जिल्ह्याने पटकाविला प्रथम क्रमांक
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
 एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत राज्यामध्ये जिल्हा स्तरावर तसेच प्रकल्प स्तरावर पोषण अभियान कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकारी-कर्मचार्‍यांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून दि.08 मार्च रोजी महिला व बालविकास मंत्री ड.यशोमती ठाकूर यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

पोषण अभियान जन आंदोलन कार्यक्रम सर्वोत्कृष्ट सहभागाबद्दल रायगड जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकाविला असून यानिमित्त जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी नितीन मंडलिक यांना ड.यशोमती ठाकूर यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरविले जाणार आहे.
नुकतेच एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित महिलांच्या विशेष मेळाव्यात राज्य पोषण संसाधन कक्ष, पोषण अभियानच्या आयुक्त तथा राज्य प्रकल्प संचालक रुबल अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी नितीन मंडलिक यांचे पोषण अभियान जन आंदोलन कार्यक्रमात रायगड जिल्ह्याने दिलेल्या सर्वोत्कृष्ट सहभागाबद्दल विशेष कौतुक करून आभार मानले होते.

Exit mobile version