विद्युत तारांमुळे अपघाताची शक्यता

| सुधागड/पाली । वार्ताहर ।

सुधागड तालुक्यातील पाली बाजारपेठेत भोराई कॉम्प्लेक्स जवळ डॉक्टर नितीन दोशी यांच्या दवाखान्या समोर विद्युत खांबावरून केबल कित्येक दिवस लोंबकळत आहे. सदरची केबलच एक टोक जमीनीवर पडल आहे. तर दुसरे टोक हे विद्युत खांबावर आहे. या केबल मधून विद्युत प्रवाह होऊन अपघाताची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. त्यामुळे या परिसरात राहणारे नागरीकांनमध्ये भितीचे वातावरण आहे. सदरची केबल ही बीएसएनएलनची असल्याचे बोलले जात आहे. या बाबत महावितरण तसेच बीएसएनएल कार्यालयात बाबत वारंवार तक्रार करुनही आज हि केबल जैसे थे आहे. भोराई कॉम्प्लेक्स या इमारतीमध्ये डॉक्टर नितीन दोशी यांचा दवाखाना आहे. त्यामुळे दवाखान्यात उपचारासाठी रुग्ण येत असता तसेच शेजारी फलांचे, कडधान्य विक्रीते ही बसलेले असतात. एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. त्यामुळे या विद्युत खांबावरील लोंबकळणा-या धोकादायक केबल दूर करण्यात यावी अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत.

Exit mobile version