फणसाड-सुपेगाव रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

| कोर्लई | प्रतिनिधी |

मुरुड-रोहा प्रवासात जवळचा पर्यायी मार्ग असलेल्या मुरुड तालुक्यातील फणसाड-सुपेगांव मार्गावर काही ठिकाणी आदिवासी वाडी सुमरादेवी ते सुपेगावच्या पुढील अवघड वळणापर्यंत अनेक ठिकाणी मागील पावसाळ्या पासून खाच-खळगे व खड्डे पडल्याने. हा रस्ता अपघाताला आमंत्रण ठरत असून, याकडे संबंधित बांधकाम खात्याचे दुर्लक्ष असल्याबाबत नाराजी व्यक्त होत असून तातडीने रस्ता दुरुस्ती डांबरीकरण न झाल्यास उसरोली पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या सहकार्याने आंदोलन करण्यात येईल. असा इशारा अविनाश शिंदे यांनी दिला आहे.

गेले कित्येक वर्षे सुपेगाव मार्गावर रस्ता न बनविल्याने अद्याप खड्ड्यातच आहे. मुरुड-जंजिरा पर्यटनात रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर अन्य ठिकाणाहून काशिद-बिच, फणसाड अभयारण्य, मुरुड-जंजिरा किल्ला पाहाण्यासाठी रोहा सुपेगांवमार्गे मुरुड रस्ता जवळचा असल्याने या रस्त्यावर वाहनांची वाढती वर्दळ असते. या पंचक्रोशीतील अनेकांना आपल्या रोजीरोटीसाठी टू -व्हीलर वरून दररोज प्रवास करावा लागतो. गेले कित्येक वर्षापासून या रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी खड्ड्याचे साम्राज्य असून, वाहन चालकांना आपली वाहने चालवताना कसरत करावी लागते आहे. खड्यांच्या साम्राज्यामुळे या रस्त्यावर वेळप्रसंगी अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. शासनाच्या संबंधित बांधकाम विभागाने यात लक्ष देऊन सुपेगांव मार्गावरील रस्त्या दुरुस्ती डांबरीकरण न झाल्यास नाईलाजास्तव पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा अविनाश शिंदे यांनी दिला असून याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची राहील असे म्हटले आहे.

Exit mobile version